बहिर्जी नाईक
बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते. दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वाऱ्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज - आजकुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत- दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत. शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपऱ्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा.
त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभूत माहिती महाराजांना दिली होती. बर्याच वेळा महाराज बहिजींनी दिलेल्या सल्यांचा विचार करून पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते. अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासून व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.
सुरतेची पाळती
सुरतेहून पाळती बहिर्जी जासूद आला. सुरतेची पोथी त्याने महाराजांपुढे वाचली आणि म्हणाला की, 'सुरत मारील्याने अगणित द्रव्य सापडेल, असे सांगितले त्याजवरून राजीयांनी विचार केला, आणि बेत निघाला. सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुभती म्हैसच होती. दिल्ली खालो खाल दिमाख होता सुरतेचा अशा ह्या सुरतेत औरंगजेबाच्या... पाच हजार सैनिकांचा जागता पहारा. सुरतेभोवती अभेद्य तटबंदी राजगडापासून अंदाजे ३२५ किलोमीटर उत्तरेला असलेल्या ह्या सुरतेच्या प्रत्येक घराची खडान खडा माहिती राजांना होती कारण राजांचा तिसरा नेत्र सुरतेवर पाळत ठेवून होता तो तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक. सुरत म्हणजे ऐश्वर्य. अवघ्या जगातील व्यापाराच्या मोठ्या घडामोडी इथे चालत अठरा टोपीकर, इराणी, हापशी, तुराणी, बगदादी, अरबी, बोहरा, खोजा, यहुदी, अफघाणी, मुघली इत्यादी परदेशी व्यापारीही इथून व्यापार करत असत. ह्या लोकांनी सुरत भरून गेली होती. औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती, नागवली होती ह्याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती. ई.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. शत्रूला ही चिंता फार सतावित नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूलन्यास बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहित असलेली सुरतेची पहिली लुट, सुरत शहर (जे आजच्या गुजरात राज्यात येते) हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक -आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रीया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट साध्य केली गेली.
मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लूटीतून संरक्षण दिले गेले सुरतेवर निघण्याची तयारी जय्यत झाली. आठ हजार घोडेस्वार तयार झाले. निघण्याचा दिवस ठरला १५ डिसेंबर १६६३. आई जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले. मजल दरमजल करत ५ जानेवारी १६६४, मंगळवार सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० -वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उपन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, 'इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. पण दिखाऊ कर्तबगारीचा तो इनायतखान बहादूर याने महाराजांचे सौजन्यशील फर्मान धुडकावून लाविले. त्या मगरूरी मुळे महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा केली. सावकारांचे वाडे काबीज करून सोनं, रूपे, मोती, पोवळे, माणीक, हिरे, पाचू, गोमेदराज, असे नवरत्ने नाणे, मोहोरा, पुतळ्या, इभ्राम्या, तराम्या, असफ्या होन, नाणे नाना जातींचे इतका जिनसांच्या धोकटीया भरल्या. कापड, भांडे, तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही. असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले सूरत मनसोक्त लुटून महराज आल्या मार्गानेच निसटले.
इतिहास काळापासूनचं लुट ह्या शब्दानेच अंगावरती काटे उभे राहतात, अर्थातच भयावह असणा-या ह्या शब्दाला देखील महाराजांनी किती वेगळाच अर्थ दिला. लुट म्हटली की कत्तली ह्या
अग्रभागीच कुणाचीच गय त्यात केली जात नाही. कुठलेही ठिकाण सोडले जात नाही. पण परधर्माची मंदिरेच काय साध्या
मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लुट घडविले माझ्या राजाने! दिनांक ५ जानेवारी १६६४ पासून पुढे ४ दिवस ही लुट चालू होती.
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा
मुजरा............