Baji Prabhu Deshpande(बाजी प्रभू देशपांडे)
10 February 2023

Baji Prabhu Deshpande(बाजी प्रभू देशपांडे)

बाजी प्रभू देशपांडे


बाजी प्रभू देशपांडे हे मराठ्यांचे शूर योद्धे होते. पावनखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत पावनखिंड रोखून धरली. बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे बाजी दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी है अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी, आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ते तास खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै, .. १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे. घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.

बाजी प्रभूची समाधी

मी आणि माझे दोस्त काही दिवसा पूर्वी विशाळगड वर बाजी प्रभू ची समाधी पाहण्यासाठी गेलो होतो. मनात फक्त बाजी आणि त्यांच्या मावळ्यांच्या शोर्याचा पराक्रम डोक्यात होता. गड चढत चढत विचार येत होते की कशी असेल बाजी प्रभू समाधी आणि आत्ता अधिकच उत्सुकता वाढतच होती. त्या पावन खिंडतील बाजीचे शब्द मनात गोधळू लागले होते...




"
राजे तुम्ही निम्मे मावळे घेवून विशाळ गड घाटा मी येथेच तुम्ही विशालगडा वर पोहचे पर्यंत हि खिड लढवतो"


"
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशीदा जगाला पाहिजे, -आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा"


आम्ही गडावर जाताच क्षणी बाजी प्रभू समाधी समाधीची चौकशी केली कि ती कोठे आहे पण तेथील काहीनी सागितले कि - आम्हाला माहित नाही आणि काहींनी सागितले जरा पुढे आहे. असे करत करत आम्हाला .३० ते तास लागले समाधी शोधण्यासाठी ती गडाच्या एका बाजूला एकाकी पडलेली तिकडे कोणीही जात नाही आणि फिरकत हि नाही पाहतो तर काय ज्या बाजी फुलाजी बंधूंवर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा या बाजी फुलाजी यांची समाधी अशी धूळ, उन, वारा खात खितपत पडली आहे. त्या समाधीवर एक फाटका रंग उडलेला भगवा धज्व मन भारावून गेले आणि अलगद डोळ्यातून एक अश्रू आला कि हि ती समाधी ज्या माणसाने शिवरायांसाठी सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ते तास खिंड लढविली आणि अखेर महाराज विशाळ गड वर पोहचल्यावरच प्राण सोडला ह्याची हि अवस्था पाहून मनात आले कि कसला मराठी पणा आणि बाणा ज्या माणसाची समाधी ह्या सोन्याच्या हव्या होत्या परंतु काही विचित्र चित्र नजरेस पडाले ... आम्ही सर्वजन फक्त एकामेकाकडे पाहत होतो आम्हाला काहीच सुचत नव्हते. एक वाक्य मनात सारखे येत होते कि
"
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशीदा जगाला पाहिजे आज एक बाजी मेला तर अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा"