Jiva Mahale(जिवा महाला)
10 February 2023

Jiva Mahale(जिवा महाला)

जिवा महाला


जिवाजी महाला हे श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक होते, त्याने प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते.
गाव:
जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री. पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.


घराण:
वंशावळ - जिवा महालाचा मोठा भाऊ हा ताना (तानाजी) महाले संकपाळ असावा. जिवा महालाचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी होय. हरी आणि सुभानजी हे जिवा महालाचे खापरपणतू होतात.
जिवा महाला यांचे वडील पहिलवान होते, त्यांनीच जिवा महाला यांना पहिलवानीचे धडे दिले होते. जिवाचे वडील शिवाजी राजांचे वडील शहाजी यांच्या सेवेत होते. युद्धसमयी त्यांना एक पाय गमवावा लागला होता.
पराक्रमः
शिवाजी राज्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाशी दोन हात करून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. या प्रसंगी जिवा महालाचे वय २५च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी, वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जिवा महाला यांची समाधी आहे. दांडपट्टा चालविण्यात महाले समुदाय हा
पटाईत होता. आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालवतात. जिवा महाला सुद्धा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता. सैयद बंडाने महाराजांवर तलवार उगारली तेव्हाच दांडपट्टा काढून जिवा महालाने त्याला पालथा पाडला होते, "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण या प्रसंगावरून पडली.